अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने अखेर माजी आमदार अशोक भाऊ जाधव यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली आहे. सचिन सावंत यांनी अंधेरी पश्चिममधील उमेदवारीला नकार दिल्यानंतर काँग्रेसने जाधव यांच्यावर विश्वास ठेवला आहे.
जाधव हे अंधेरी पश्चिम मतदारसंघातील लोकप्रिय नेते मानले जातात. स्थानिक पातळीवर त्यांचा जनाधार मजबूत आहे आणि त्यांनी अंधेरीतील विविध विकासकामे आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कायमच सक्रिय भूमिका निभावली आहे. जाधव यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा आहे.
सचिन सावंत यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केल्यानंतर अंधेरीतील उमेदवारीसाठी अनेक नावे चर्चेत होती. परंतु, अखेर पक्षश्रेष्ठींनी जाधव यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केली आहे.