अकोला : जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यलयात महत्त्वपूर्ण प्रवेश सोहळा पार पडला. जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर पाटील यांनी ” बटेंगे तो कटेंगे, जुडेंगे तो विकास सोबत राष्ट्रवाद मजबूत होईल” या घोषवाक्यासह कार्यकर्त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी उद्धव सेनेचे तसेच भारिप काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये सामील झाले.
किशोर पाटील यांनी सांगितले की, विधानसभेच्या निवडणुकीत आणि सामाजिक कार्यात सक्रिय असणारे, शेतकरी व युवकांचे आवाज बुलंद करणारे आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वासाठी प्रत्येक समाजातील नागरिक व युवाशक्ती महायुतीच्या पाठीशी उभी आहे. त्यांनी आमदार सावरकर यांच्या कामाचा गौरव करत, अकोला जिल्ह्यात सर्वांगीण विकास साधण्याची बांधिलकी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला खासदार अनुप धोत्रे, महायुतीचे उमेदवार आमदार रणधीर सावरकर, अकोला पश्चिमचे उमेदवार विजय अग्रवाल, महानगर अध्यक्ष जयंत मसने यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच, सिसा मासा, डोंगरगाव, कुंभारी, बोरगाव मंजू या भागातील अनेक युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
प्रवेश सोहळ्यात मोदीधर चौरे, शुभम गवई, सिद्धू इंगळे, विशाल वानखडे, पंकज उमाळे, हर्षद इंगळे, आणि इतर अनेक नवोदित कार्यकर्त्यांनी भाजपात सहभाग घेतला.