नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली, त्याचबरोबर काही विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकांचा देखील समावेश केला. यामध्ये विशेषतः केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा समावेश आहे.
जून महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन मतदारसंघातून विजय मिळवला. नियमानुसार, त्यांना एका मतदारसंघाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांनी वायनाडची जागा सोडली. त्यानंतर काँग्रेसने प्रियांका गांधी यांच्या नावाची घोषणा केली.