“गोरेगावचा विकास: समीर देसाईंची मशाल पेटवण्याची तयारी!”
गोरेगाव विधानसभेत सध्या चर्चा आहे ती समीर देसाई यांच्या नेतृत्वाची. “प्रगतीच्या वाटेवर एकत्र येऊ, गोरेगावचा विकास घडवू!” हे त्यांचे घोषवाक्य गोरेगावकरांच्या हृदयात ठसले आहे. त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य म्हणजे समाजाच्या प्रत्येक घटकाला जोडणारे त्यांचे नेतृत्व. धर्माच्या सीमांपलीकडे जाऊन, ते हिंदू, मुस्लिम, बौद्ध, आणि इतर सर्व धार्मिक समुदायांच्या उत्सवांत सहभागी होतात. त्यांच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे त्यांचे कार्य लोकप्रिय झाले आहे.
केवळ धार्मिक उत्सवांमध्ये सहभागच नाही, तर समीर देसाई यांनी गोरेगाव विधानसभेतील विद्यार्थ्यांना, खेळाडूंना आणि तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठीही पुढाकार घेतला आहे. त्यांनी त्यांच्या शैक्षणिक आणि क्रीडा विकासासाठी विविध उपक्रम राबवले आहेत, ज्यामुळे या तरुणांचे मनोबल वाढले आहे.
त्याचबरोबर, नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांकडे ते विशेष लक्ष देतात. कोविडसारख्या संकटकाळात त्यांनी निःस्वार्थपणे मदत केली आणि “संकटमोचक” म्हणून आपल्या जबाबदारीचे निर्वहन केले. हेच कारण आहे की, आज गोरेगावकर त्यांच्याकडे एका विश्वासार्ह नेत्याच्या नजरेने पाहतात.
या विधानसभा निवडणुकीत समीर देसाई मशाल पेटवणार असल्याची चर्चा जोरात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गोरेगावचा विकासाचा अजेंडा आणखी पुढे जाणार आहे. “गोरेगावचा विकास हाच माझा ध्यास आहे” असे म्हणत, ते सातत्याने गोरेगावकरांच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध आहेत.
जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव