जिंतूर : शहरात दि. 3 नोव्हेंबर रोजी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा जिंतूरच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन सम्राट अशोक बुद्ध विहार येथे करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन तालुकाध्यक्ष मोहन भाऊ घनसावंत व सुनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कार्यशाळेचे अध्यक्षस्थान शंकर भारशंकर सरांनी भूषविले. सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे आणि राष्ट्रनिर्माणाच्या दिशेने बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या उद्देशांनुसार प्रशिक्षण देणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन परभणी जिल्हा समता सैनिक दलाचे अध्यक्ष अशोकराव कांबळे यांच्या हस्ते झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मेजर जनरल आनंद भैरजे आणि मेजर जनरल संतोष दुंडे यांनी मार्गदर्शन केले, तर सहाय्यक मार्गदर्शक म्हणून महेंद्र बनसोडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या ध्वजारोहणाचा मान रावसाहेब हारभरे, विशाल घनसावंत, आणि आशाताई वाकळे यांनी प्राप्त केला. बौद्धाचार्य गणेश खिल्लारे यांनी सामूहिक धम्मवंदना दिली, आणि कार्यक्रमाचे सुञसंचालन बौद्धाचार्य विकासआण्णा मोरे यांनी केले. या कार्यशाळेला ऍड. रमेश भडगळ, ऍड. कुमार घनसावंत, विलास वाकळे, आशाताई खिल्लारे, प्रीती लांडगे, आणि बळीराम उबाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गौतम गवळी, नितिन वाकळे, स्वप्नील रायबोले, हर्षराज भैरजे, धनराज घनसावंत, आणि सिद्धार्थ घनसावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.