Breaking
21 Nov 2024, Thu

जिंतूर तहसील कार्यालयाच्या नाकावर टिच्चून अतिक्रमण – भाग ३

वाढती महागाई आणि बेरोजगारीला कंटाळून पुणे मुंबई संभाजीनगर नाशिक नागपूर या महानगरात जाऊन कामधंदा तिथे पोट भरण्यापेक्षा जिंतूर मध्ये एखादा छोटा व्यवसाय करून चार पैशांची आवक आणि आपला कुटुंबाचा प्रपंच चालावा यासाठी काही करता येईल का..? म्हणून धडपडणारी अनेकजण जिंतूर शहरात पाहायला मिळतात. याचाच एक भाग म्हणून जिंतूर तहसील कार्यालय परिसर हा व्यवसायासाठी उत्तम मार्ग आहे, अशी पक्की धारणा बनली आहे. यासाठी लागणारे भांडवल खूप वाजवी आहे. यासाठी एखाद्या बड्या नेत्याची ओळख असणे गरजेचे आहे. राजकीय पुढार्‍याचा आसरा घेऊन जिंतूर तहसील कार्यालय परिसरात दिसेल त्या मोकळ्या जागेत पत्राची टपरी किंवा मग चव्हाळ बांबूचा आसरा घेऊन एक टेबल आणि खुर्ची टाकून तहसील कार्यालयाने नाकारलेली बहुतांश कामे बोगस कागदपत्रे तयार करून नियमांत बसवली जातात. स्वतःचा उद्योग उभारून व्यवसाय करणाऱ्या लोकांप्रती अनेकांच्या मनात सहानुभूती असणं गैर नाही. नियमाप्रमाणे कागदपत्रे तयार करून एखाद्या गरिबाचं काम करून देणे यात काहीच चुकीचे नाही, परंतु शासकीय दस्तऐवजात खाडाखोड करून बनावट कागदपत्र तयार करणे हा कोणता व्यवसाय..? ही शासनाची फसवणूक आहे. वादातील आणि गुंतागुंतीची न होणारी कामे आपण तात्काळ करून देतो. असे ठासून सांगणारे काही लोक या तहसील परिसरात कार्यरत आहेत. अनेकांना वाटत असेल यांचा दैनंदिन रोज किती असेल…? तर तुम्हाला आयकून आश्चर्य वाटेल.. तहसील कार्यालयात खाजगी एजंट बनुन लोकांच्या फाईल कार्यालयातून मंजूर करून आणणे हा मोठा व्यवसाय बनला आहे.

🔴असे आहेत फाईल मंजूर कण्याचे रेट..

संजय गांधी योजना फाईल मंजूर करणे
(निराधार)
2000₹

👉🏻राजीव गांधी योजना विधवा महिलांची फाईल मंजूर करणे
2000₹

👉🏻21,00₹ चे बनावट उत्पन्न प्रमाणपत्र
3000₹

👉🏻नवीन राशनकार्ड PHH ऑनलाईन करणे
प्रति व्यक्ती 5kg महिना
3000₹

👉🏻अन्न सुरक्षा योजना कार्ड
35kg महिना
3000

👉🏻नविन पिवळे राशन कार्ड
5000₹

👉🏻मागील तारखेचे जुने बॉण्ड
प्रतिवर्ष 1000₹ प्रमाणे

👉🏻सातबारा वरील बोजा कमी करून देणे
बोजा प्रति 50,000₹ प्रमाणे कमी करून देणे 10,000₹

👉🏻कामधकाऊ बनावट प्रमाणपत्र
300-500₹


🔴आता पाहू एका दुकानातून किती पोट भरले जाते…

👉🏻समजा एका दुकानातून महिन्याला किमान20 बोगस उत्पन्न प्रमाणपत्र दिले तर 60k महिना मिळतो

👉🏻पाच पिवळे राशन कार्ड विकले
तर 25000 महिना

👉🏻पाच जुने बॉण्ड विकले
5000₹ महिना

👉🏻पाच बोगस सातबारा तयार करून दिल्या तर
प्रति सातबारा 10,000रू महिना प्रमाणे 50,000₹

हा सर्व फक्त एका दुकानातील महिनेवारी बोगस कारभाराचा अंदाज आहे, अशी पन्नास जवळ दुकाने थाटली आहेत. ही सर्व बोगस कागदपत्रे याच अतिक्रमित दुकानातून बनवून दिली जातात. हा सर्वश्रुत खुला बाजार सुरू असताना. या अतिक्रमणावर जिंतूर तहसील कार्यालय बघ्याची भुमिका घेत आहे याचे आश्चर्य वाटते.

 

भाग – १ वाचण्यासाठी येथे Click करा. 

भाग – २ वाचण्यासाठी येथे Click करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *