“येतो झाकी है; और बहुत कुछ बाकी है…” – तालुकाध्यक्ष निलेश महाडिक
प्रतिनिधी : रामदास चव्हाण
रायगड : महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाचा नेता आपला पक्ष मजबूत करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात पक्ष फोडाफोडीचे राजकारण सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामध्ये आमदार गोगावले यांचा पक्ष अव्वल स्थानावर असून स्नेहल जगताप यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेशाची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.
शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हे महायुतीतील घटक पक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी कोणताही पक्ष प्रवेश घेतला नव्हता, परंतु महायुतीतील घटक पक्ष शिंदे गट मात्र कार्यकर्त्यांना फोडून आपल्या गटामध्ये सामील करून घेत असल्याचे चित्र स्पष्ट आहे.
आज किंजलोळी खुर्द भालेकर कोंड येथील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला. तालुका प्रमुख निलेश महाडिक यांनी यावेळी स्पष्ट केले की, “शिंदे गट व उबाठा गटामध्ये आमच्या पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते येणार आहेत.”
या पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुभाष निकम, अपेक्षा कारेकर, चंद्रकांत बुवा जाधव, मन्सूर देशमुख, निलेश महाडिक, रिहान देशमुख, राकेश शहा, बाळा सकपाळ, सोनल उतेकर, राजेश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.