यलदरी रस्त्याने प्रवास करणाऱ्या गावातील नागरिकांचे अनोखे आंदोलन
जिंतूर प्रतिनिधी
जिंतूर-यलदरी रस्त्यावर मागील काही दिवसांपासून मोठं मोठी खड्डे पडले आहेत यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष करीत आहे म्हणून त्यांच्या निषेधार्थ दिनांक 9 ऑक्टोबर रोजी रस्त्यावर पडलेल्या खड्यात नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदवून खड्डे जेवण कार्यक्रम पार पडला..
जिंतूर यलदरी मार्गे विदर्भात जाण्यासाठी एकमेव मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते शिवाय परीसरातील अनेक गावात जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो मात्र मागील काही दिवसांपासून रस्त्यावर जागोजागी मोठं मोठी खड्डे पडली आहेत रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे रस्त्यावरील खड्यामुळे नेहमीच अपघात घडत आहेत परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे परंतु वेळोवेळी गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे म्हणून यलदरी,शेवडी,माणकेश्वर, केहाळ,आंबरवाडी आदी गावातील नागरिकांनी यलदरी रस्त्यावर दीड हजार खड्डे पूर्ण झाल्या बदल शहरातील प्रमुख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना खड्डे जेवणाचे निमंत्रण पत्रिका देऊन मोठ्या खड्याजवळ जेवणाचा पंगतीचे आयोजन केले होते यावेळी परिसरातील नागरिकांनी निष्क्रिय सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त केला दरम्यान नागरिकांनी आज केलेल्या अनोखे आंदोलनामुळे सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता.