पाकिस्तानकडून चार तासांत युद्धबंदीचा भंग; सीमेवर पुन्हा तणाव निर्माण

नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारत आणि पाकिस्तानमधील ८६ तास चाललेले युद्ध शनिवारी संध्याकाळी ५ वाजता अधिकृतरीत्या संपुष्टात आले. दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली होती. मात्र केवळ चार तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन करत सीमेपलीकडून गोळीबार आणि ड्रोनद्वारे हल्ले सुरु केले आहेत, त्यामुळे सीमेवरील तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पाकिस्तानकडून अखनूर, राजौरी, आर.एस. पुरा आणि पालनवाला सेक्टरमध्ये जोरदार तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. यासोबतच काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात एका संशयित ड्रोनचा स्फोट झाल्याचीही माहिती आहे. या हल्ल्यांमुळे काही ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी ३.३५ वाजता भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती. संध्याकाळी ५ वाजल्यापासून जमिनीवर, हवेत आणि पाण्यातून होणारे सर्व प्रकारचे हल्ले थांबवण्याचे ठरले होते. ही युद्धबंदी दोन्ही देशांनी मान्य केली होती आणि १२ मे रोजी पुढील चर्चा नियोजित होती. मात्र पाकिस्तानकडून पुन्हा एकदा युद्धबंदीचे उल्लंघन करण्यात आले आहे.

या प्रकारामुळे सीमेवर सतर्कता वाढवण्यात आली असून सायरन वाजवत स्थानिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक संघर्षाचा व्हिडीओ ट्विट करत विचारले आहे की, “शस्त्रसंधीचं काय झालं?

सध्या सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण असून भारतीय लष्कर सतर्क आहे. पुढील कारवाईबाबत अधिकृत प्रतिक्रिया आणि निर्णयाची प्रतीक्षा आहे.

  • Pankaj Helode

    पंकज हेलोडे हे 'स्वराष्ट्र माझा' न्यूज चॅनलचे संस्थापक, संपादक आणि संचालक आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून 'सामान्य माणसाचा बुलंद आवाज' बनण्याच्या ध्येयाने त्यांनी या चॅनलची स्थापना केली. महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या आणि सामाजिक विषयांना निर्भीडपणे मांडणारे पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली 'स्वराष्ट्र माझा' ने अल्पावधीतच एक विश्वासार्ह आणि लोकप्रिय डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म म्हणून नाव कमावले आहे. सत्यनिष्ठ आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कार्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

    Related Posts

    ख्रिश्चन हत्याकांडावरून ट्रम्पचा नायजेरियाला इशारा: ‘अन्यथा अमेरिका हल्ला करेल’

    अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आफ्रिकेतील देश नायजेरियाला (Nigeria) थेट लष्करी कारवाईचा इशारा देत मोठी खळबळ उडवून दिली आहे. नायजेरियामध्ये ख्रिश्चन धर्मीयांच्या होत असलेल्या हत्या आणि कथित…

    Continue reading
    हाफिज सईदचा नवा कट? बांगलादेश सीमेवर संशयास्पद हालचाली!

    ढाका: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईद (Hafiz Saeed) याने पुन्हा एकदा भारताविरुद्ध नवा कट रचण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. हाफिज सईदचा एक अत्यंत जवळचा सहकारी आणि पाकिस्तानी…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *