मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार; कुकी बंडखोरांचा उपायुक्त कार्यालयावर हल्ला, पोलीस अधीक्षक जखमी

गेल्या वर्षभरात मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटनांनी राज्याला हादरवून सोडलं आहे. या हिंसाचारात आतापर्यंत शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले असून, हजारो लोबेघर झाले आहेत. शांततेच्या अपेक्षांनंतरही राज्यात अद्याप स्थैर्य प्रस्थापित होऊ शकलेले नाही.

ताज्या घटनेत, कांगपोकपी जिल्ह्यात कुकी बंडखोरांनी उपायुक्तांच्या कार्यालयावर हल्ला चढवला. या हल्ल्यात कांगपोकपीचे पोलीस अधीक्षक जखमी झाल्याचे वृत्त आहे. बंडखोरांनी आधी मोर्चा काढून नंतर थेट प्रशासकीय मुख्यालयावरच हल्ला केला. हल्ल्यात प्रशासकीय वाहनांचीही तोडफोड करण्यात आली.

या घटनेनंतर कांगपोकपीत तणाव निर्माण झाला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या भागात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटनांचा अनुभव असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

३१ डिसेंबर रोजी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राज्यातील हिंसाचाराबाबत खेद व्यक्त करत माफी मागितली होती. त्यांनी वर्षभरातील घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले होते आणि राज्यातील जनतेची माफी मागितली होती. मात्र, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अशा घटनांनी पुन्हा राज्यातील शांततेसाठी मोठं आव्हान निर्माण केलं आहे.

सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र घटनांच्या वाढत्या सत्रामुळे राज्यातील तणाव अधिकच गडद होताना दिसत आहे.

 

  • Related Posts

    महिला डॉक्टरला मारहाण: रमेश म्हात्रे यांना अखेर अटक!

    ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या एका अत्यंत संतापजनक प्रकरणाला आज मोठा कलाटणी मिळाली आहे. शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांनी एका रुग्णालयात घुसून महिला डॉक्टर आणि…

    Continue reading
    रमेश म्हात्रे यांच्यावर गुन्हा; KDMC रुग्णालयात मारहाण

    शिंदे गटाचे नेते रमेश म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल; KDMC रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला मारहाण कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर आणि परिचारिकांना (नर्स) अत्यंत अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी, शिंदे गटाचे…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *