फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

नवी दिल्ली – ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने महत्त्वाचा निर्णय घेत डिसिप्लिनरी ऍक्शन कमिटीच्या (शिस्तभंग समिती) अध्यक्षपदी फरहान आझमी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्ष संघटनेत शिस्त व नियोजनबद्धता राखण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावते.

फरहान आझमी यांचे काँग्रेस पक्षाशी जुने नाते आहे. त्यांनी अल्पसंख्याक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. तसेच, *फरहान आझमी फाउंडेशन*च्या माध्यमातून समाजसेवेचे भरीव कार्य केले आहे. गरजूंसाठी मदतीचे हात पुढे करण्यापासून ते पक्षाच्या धोरणांना जनतेपर्यंत पोहोचवण्यापर्यंत त्यांनी मोठे योगदान दिले आहे.

त्यांच्या या नेत्यत्त्वगुणांची आणि सातत्यपूर्ण कार्यपद्धतीची दखल घेत त्यांची नव्या जबाबदारीसाठी निवड करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयाने कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

  • Related Posts

    मुंबई आम्ही अजूनही रोखू शकतो; संजय राऊतांचा भाजपला इशारा

    मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि सत्ताधारी शिंदे गटावर कडाडून टीका केली आहे. “आम्ही आजही…

    Continue reading
    नवनीत राणा यांचा पवारांवर घणाघात; फडणवीसांबाबत मोठा दावा!

    मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुतीमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजपच्या नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. भ्रष्टाचाराच्या…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *