सतना (मध्य प्रदेश): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा ‘अखंड भारत’ संकल्पनेला अधोरेखित करत एक मोठे विधान केले आहे. “फाळणीमुळे भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान हा भारताचाच एक भाग आहे आणि तो परत मिळवणे हा आपला संकल्प आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी मध्य प्रदेशातील सतना येथे व्यक्त केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
सतना येथील बाबा मेहरशाह दरबारच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सिंधी समाजाचे उदाहरण देत म्हटले की, “सिंधी बांधव पाकिस्तानातून आलेले नाहीत, तर ते अखंड भारतातून आले आहेत. ही भावना नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे.”
आपल्या भाषणात त्यांनी घराचे उदाहरण देत विषय अधिक सोपा करून सांगितला. ते म्हणाले, “आपल्या घराची एक खोली (पाकिस्तान) कोणीतरी हिसकावून घेतली आहे आणि ती आपल्याला परत मिळवायची आहे. जो भाग आपला आहे, तो आपल्याला परत मिळवावाच लागेल.”
याचबरोबर, परदेशात सर्व भारतीयांची ओळख ‘हिंदू’ म्हणूनच होते, हे सत्य स्वीकारून आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. भाषेच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, भाषा अनेक असल्या तरी भाव एकच असतो आणि प्रत्येक नागरिकाला किमान तीन भाषा (मातृभाषा, राज्याची भाषा आणि राष्ट्रभाषा) अवगत असायला हव्यात, असे मत त्यांनी मांडले. मोहन भागवत यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
TEX-RO Air Tight Container For Fridge Organizer Plastic Container Storage Set Fridge Storage Boxes, Kitchen Accessories Set Organization & Kitchen Storage(Set of 3, 800 ml)
Amazon वर खरेदी करा





