जिंतूर प्रतिनिधी
तालुक्यातील जोगवाडा येथील रहिवासी असलेल्या एका 50 वर्षीय शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जाच्या डोंगरामुळे घरातील लाकडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरूवार दि १० आक्टोंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस घडलीया घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मागील अनेक वर्षांपासून होत असलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे उत्पन्नात कमालीची घट व त्यातही शेतमालाला अल्पभाव या कारणाने तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे उसनवारी करून घेतलेले बियाणांचे खर्च देखील या वेळेस निघत नसल्याने संबधित शेतकरी अडचणीत आला होता सततची नापिकी आणि खाजगी कर्ज आणि बँकेचे कर्जाला कंटाळून जोगवाडा येथील आश्रोबा लाखाडे वय 50 वर्ष शेतकऱ्याने घरातील पत्राखालील लाकडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार घरच्या मंडळीच्या लक्षात आल्यानंतर सदर घटनेची माहिती चारठाणा पोलीसाना देण्यात आली. घटनास्थळी साहाय्यक साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल अंधारे पोहेकाॅ.सूर्यकांत केजगीर, रामकिशन कोंडरे अदींनी घटनास्थळी भेट घेऊन आश्रोबा लाखाडे याना खाली घेऊन जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मयताचे शवविच्छेदन जिंतूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे. मयताच्या पश्चात पत्नी,दोन मुलं दोन मुली असा परिवार आहे. या प्रकरणी मयताचा मुलगा गजानन लाखाडे याच्या तक्रारी वरून चारठाणा पोलीस ठाण्यात अकास्मीत मुत्युची नोंद करण्यात आली आहे