Breaking
3 Dec 2024, Tue

“अजून किती दाढी पिकवायची?” – निलेश राणेंची कुडाळ मालवणमधील सभा चर्चेत

राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, सर्व राजकीय पक्षांचा प्रचार जोरात सुरु आहे. राज्यभरातील विविध मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुतीसह इतर पक्षांच्या नेत्यांच्या सभा, रॅली आणि मेळावे जोमाने सुरू आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत पाहायला मिळणार असून, देशभराचे लक्ष या निवडणुकीकडे लागलेले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण जोर धरताना दिसत आहे.

याच दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि कुडाळ मालवण मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे यांनी आपल्या एका विधानातून राजकीय वर्तुळात चर्चा रंगवली आहे. “माझ्यानंतर आलेले आमदार आणि मंत्री झाले. मग मी अजून किती दाढी पिकवायची?” असे विधान करत निलेश राणे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

निलेश राणे काय म्हणाले?

“मी ठरवलं आहे की, काहीतरी असं बनायचं की समोरच्याला वाटलं पाहिजे की, तो माझा माणूस आहे. जो माणूस एकटा उभा असतो त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो. आता १० वर्षे गेली, अजून किती दाढी पिकवायची?” अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

राणे यांनी आपल्या विधानात ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, अमित देशमुख आणि विश्वजीत कदम यांचे उदाहरण देत सांगितले की, “हे सगळे माझ्यानंतर आमदार झाले, मंत्री झाले. मला फक्त कुडाळ मालवण मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी, एवढंच माझ्यासाठी पुरे आहे.”

मतदारसंघात आपले प्रेम व्यक्त

निलेश राणे म्हणाले, “तुम्ही अडीच वर्षे मला सांभाळलं. जनतेचे आभार व्यक्त करतो. आतापर्यंत दिलेली साथ भविष्यातही कायम राहावी, अशी अपेक्षा आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *