केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी घेतला मुंबई शहरातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमच्या कामाचा आढावा

मुंबई, दि. ३० ऑक्टोबर, २०२४ :- मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होत आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता मुंबई शहर जिल्ह्यातील १७८-धारावी, १७९-सायन-कोळीवाडा, १८०-वडाळा, १८१-माहिम, १८२-वरळी या पाच विधानसभा मतदारसंघाचे केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी आज स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमच्या कामाचा प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला.

मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने दहा विधानसभा मतदारसंघात स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम (SST) नियुक्त केल्या आहेत. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमच्या कामकाजावर निरीक्षक (खर्च) देखरेख ठेवत आहेत.

माहीम विधानसभा मतदारसंघातील सदर सर्व्हेलन्स टीम पाहणी दरम्यान श्री. वसंता यांनी स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमच्या (SST) कामाबद्दल माहिती जाणून घेत टीमने वाहनतपासणी करण्यावर प्रामुख्याने भर द्यावा, सदर वाहनतपासणी दरम्यान रोख रक्कम, मद्यसाठा, भेटवस्तू व शस्त्रसाठा पोलिसांच्या मदतीने तपासावा, संपूर्ण तपासणीचे छायाचित्रण करण्याबाबत योग्य दक्षता घ्यावी, प्रत्येक टीमने सतर्क राहून त्यांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा अहवाल विहित वेळेत संबंधितांना पाठविण्याच्या सूचना केल्या.

विधानसभा निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात व्हाव्यात, यासाठी सदर स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमची (SST) नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांनी तीन शिफ्टमध्ये चोवीस तास काम करण्याची जबाबदारी पार पाडली जात आहे.

केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांचे संपर्क अधिकारी संदिपान मते उपस्थित होते.

  • Related Posts

    छगन भुजबळांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान: तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आदर कायम

    महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालांनंतर सत्ता वाटपाच्या टप्प्यांवरून सुरू झालेली नाराजी अजूनही शांत झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या नाराजीचा सूर उघडपणे मांडल्याने…

    विधानसभा निवडणुकीत मतदारांसाठी महायुती-महाविकास आघाडीची आश्वासनांची स्पर्धा

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांवर आकर्षक आश्वासनांची खैरात करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये प्रचंड स्पर्धा रंगली आहे. महायुतीने महिलांसाठी दरमहा ₹२१०० देण्याचे तर महाविकास आघाडीने ₹३००० देण्याचे आश्वासन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *