राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे ठाणेदार अविनाश जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

ठाणे,ता.२४ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर विधानसभेचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दस्तुरखुद्द पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत दाखल केला. ढोल ताशाच्या गजरात, `जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात भव्य मिरवणुकीद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शन यावेळी करण्यात आले. हजारों कार्यकर्त्याची तुफान उपस्थित यावेळी होती. मी तमाम ठाणेकरांच्या विश्वासावर ही निवडणूक लढवत असून नक्कीच आशीर्वाद मिळतील असा विश्वास यावेळी जाधव यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयातून वाजत गाजत निघालेली मिरवणूक राम मारुती रोड, दगडी शाळे मार्गे दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. या मिरवणुकीत मनसेचे नाशिक येथील नेते प्रकाश महाजन, ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे, अविनाश जाधव यांच्या पत्नी सोनल जाधव आदीसह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तब्बल तासभर चाललेल्या मिरवणुकी नंतर दुपारी १ वाजता मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे ठाण्यात आगमन झाले. त्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अविनाश जाधव यांनी ठाणे विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्याकडे सादर केला. यावेळी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे, अभिजित पानसे उपस्थित होते.

काम करतो २४ तास, २४ तासात

जिकडे अन्याय तिकडे अविनाश जाधव हे समीकरण बनले असून हक्कासाठी आवाज देणाऱ्या ठाणेकरांसाठी अविनाश जाधव धावून गेला आहे. बऱ्याच जणांना न्याय मिळवून दिला असल्याने आपल्या हक्काच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग उपस्थित होता. अविनाश जाधव काम करतो २४ तास, २४ तासात या आशयाचे फलक सर्वाचे लक्ष वेधून घेत होते.

  • Related Posts

    छगन भुजबळांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान: तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आदर कायम

    महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालांनंतर सत्ता वाटपाच्या टप्प्यांवरून सुरू झालेली नाराजी अजूनही शांत झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या नाराजीचा सूर उघडपणे मांडल्याने…

    विधानसभा निवडणुकीत मतदारांसाठी महायुती-महाविकास आघाडीची आश्वासनांची स्पर्धा

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांवर आकर्षक आश्वासनांची खैरात करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये प्रचंड स्पर्धा रंगली आहे. महायुतीने महिलांसाठी दरमहा ₹२१०० देण्याचे तर महाविकास आघाडीने ₹३००० देण्याचे आश्वासन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *