धुळे, 6 फेब्रुवारी 2025 (जिमाका वृत्त) – एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प धुळे-3 अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदाच्या 10 रिक्त जागांसाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 फेब्रुवारी 2025 आहे, अशी माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

रिक्त पदांची ठिकाणे

अंगणवाडी केंद्र क्रमांक – भिरडाणे, अंबोडे-2, अंचाळे-4, सावळी, विश्वनाथ-1, सुकवड, दापोरा, दापोरी, हनुमंतवाडी, धमाणे-3

अर्हता व आवश्यक अटी

  • स्थानीय रहिवासी असणे आवश्यक – ग्रामसेवक किंवा तलाठी यांचा दाखला आवश्यक
  • वयोमर्यादा
    • सामान्य उमेदवारांसाठी 18 ते 35 वर्षे
    • विधवा महिलांसाठी 40 वर्षे पर्यंत
  • अपत्य मर्यादा – अर्जदारास 2 पेक्षा जास्त अपत्य नसावे
  • शैक्षणिक पात्रता – किमान 12 वी उत्तीर्ण
  • अर्ज स्विकारण्याची मुदत – 6 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2025
  • अनुभव असल्यास प्राधान्य – अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस म्हणून 2 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असल्यास प्रमाणपत्र जोडावे

अल्पसंख्याक क्षेत्रातील अर्जदारांसाठी विशेष निकष

ज्या अंगणवाडी केंद्रांचा कार्यक्षेत्र 50% पेक्षा जास्त अल्पसंख्याक समाजाचा आहे, त्या ठिकाणी सेविका व मदतनीस पदासाठी उर्दू लेखन व तोंडी ज्ञान असलेल्या महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • अर्ज नमुना संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे.
  • अर्जासोबत जातीचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्रे, संगणक परीक्षेचे प्रमाणपत्र (असल्यास), व इतर आवश्यक कागदपत्रे साक्षांकित करून जोडावीत.
  • अर्जदार महिला स्वतः समक्ष येऊन अर्ज सादर करावा.

अधिक माहितीसाठी संबंधित गावातील अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना धुळे-3 येथे संपर्क साधावा, असे आवाहन अर्चना मोरे यांनी केले आहे.