प्रतिनिधी : रत्नदीप शेजावळे
स्थानिक मतदार संघातील विरोधी पक्षाचे अनेक बडे नेते आपल्या संपर्कात असून, येत्या पंधरा दिवसांत दर दोन दिवसांनी एक एकाचा प्रवेश केला जाईल, विरोधकांनी त्यांच्या सोबतच्या नेत्यांना धक्का दिला आता ते त्यांना धक्का देतील,अशा शब्दांत आगामी विधानसभा निवडणुक महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार विजय भांबळे यांनी शरद पवार गटात जोरदार इनकमिंग होणार असल्याचे संकेत दिले आहेत. आज दुपारी त्यांच्या जिंतूर येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अधिक माहिती अशी की, आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत जिंतूर तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष अॅड.विनोद राठोड यांनी विजय भांबळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे. पुढे बोलतांना भांबळे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठरलेल्या फॉर्म्युला प्रमाणे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सुटली आहे. त्यामुळे माझी उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. येत्या 29 तारखेला रोहित पवार आणि आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून मी नामनिर्देशन पत्र दाखल करत आहे. माझी लढाई कुणासोबत आहे, हे संपूर्ण उमेदवारी निश्चित झाल्यानंतरच मी सांगेल. हा मतदार संघ जातीपातीच्या बाबींना थारा देणारा नाही त्यामुळे सध्या ओबीसी मराठा आरक्षणाचा मुद्दा ईथे चालणार नाही. असे ही भांबळे म्हणाले. येत्या पंधरा दिवसांत अनेकजण आपल्या पक्षात प्रवेश करून महविकास आघाडीचा आमदार निवडून आणतील असा विश्वासही भांबळे यांनी बोलून दाखवला. “रुको जरा सबर करो” असा संकेत त्यांनी दिल्याने अनेकांना उत्सुकता निर्माण झाली आहे.
🔴विरोधकांनी रंडिचा डाव खेळू नये – मा.आ.विजय भांबळे
मी तेवीस वर्षे राजकारण केले, पण राजकारण करत असताना मी खालच्या पातळीवर कधी विचार केला नाही. स्थानिक आमदार आणि त्यांच्या भाजप कार्यकर्त्यांनी मिळून महाविकास आघाडीच्या बाजूने असलेल्या 7000 मतदारांची नावे वगळण्याचा डाव टाकला आहे. परराज्यातील आणि जिल्ह्यातील जवळपास 4000 बोगस मतदारांची नोंदणी केली असल्याचा आरोप भांबळे यांनी भाजपवर केला आहे.