गेल्या वर्षभरात मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटनांनी राज्याला हादरवून सोडलं आहे. या हिंसाचारात आतापर्यंत शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले असून, हजारो लोबेघर झाले आहेत. शांततेच्या अपेक्षांनंतरही राज्यात अद्याप स्थैर्य प्रस्थापित होऊ शकलेले नाही.
ताज्या घटनेत, कांगपोकपी जिल्ह्यात कुकी बंडखोरांनी उपायुक्तांच्या कार्यालयावर हल्ला चढवला. या हल्ल्यात कांगपोकपीचे पोलीस अधीक्षक जखमी झाल्याचे वृत्त आहे. बंडखोरांनी आधी मोर्चा काढून नंतर थेट प्रशासकीय मुख्यालयावरच हल्ला केला. हल्ल्यात प्रशासकीय वाहनांचीही तोडफोड करण्यात आली.
या घटनेनंतर कांगपोकपीत तणाव निर्माण झाला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या भागात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटनांचा अनुभव असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
३१ डिसेंबर रोजी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राज्यातील हिंसाचाराबाबत खेद व्यक्त करत माफी मागितली होती. त्यांनी वर्षभरातील घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले होते आणि राज्यातील जनतेची माफी मागितली होती. मात्र, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अशा घटनांनी पुन्हा राज्यातील शांततेसाठी मोठं आव्हान निर्माण केलं आहे.
सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र घटनांच्या वाढत्या सत्रामुळे राज्यातील तणाव अधिकच गडद होताना दिसत आहे.
#IndiaUnderAttack | INDIA’S SOVEREIGNTY UNDER THREAT‼️
– Armed #KukiTerrorists and Kuki mobs are currently attacking the SP and DC offices at Kangpokpi, Manipur– SP of Kangpokpi, Shri. Manoj Prabhakar along with senior officers of @crpfindia have been injured
– Kuki… pic.twitter.com/0yF2MYqESW
— Tribal Koubru (@koubru_lakpa) January 3, 2025