नवी दिल्ली: निवडणूक आयोग (EC) आज दुपारी 3.30 वाजता महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या आगामी निवडणुकीची अधिकृत घोषणा करणार आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात, तर झारखंडमध्ये 5 टप्प्यात मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रात सध्या शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत असून, ही निवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा कार्यकाळ लवकरच संपत असून, तिथे निवडणुकीला मोठी राजकीय रणधुमाळी होण्याची चिन्हे आहेत.
मतदानाच्या तारखा, उमेदवारांच्या यादीसाठी अर्जाची शेवटची तारीख, आणि निकाल जाहीर होण्याच्या तारखा याबाबत अधिकृत माहिती आजच्या पत्रकार परिषदेत समोर येईल. याबाबतच्या अधिकृत घोषणेची सर्वांनाच उत्सुकता आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आपले धोरण ठरवतील आणि प्रचाराच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात होईल.