Breaking
3 Dec 2024, Tue

आईच्या मृत्यूनंतर तरुणानेही घेतली विहीरीत उडी, किन्होळा येथे दु:खद घटना

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मौजे किन्होळा येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दि. 20/10/2024 रोजी, रात्रीच्या वेळी वृद्ध महिला यमूना बाई दशरथ भुजग (वय ७०) घराबाहेर पडल्यावर विहीरीत पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी त्यांच्या मुलाला, बद्री दशरथ भुजग यास, आईचे प्रेत विहीरीत आढळले.

 

या दु:खद घटनेमुळे हतबल झालेल्या बद्रीने आईचे प्रेत विहिरीतून बाहेर काढले, परंतु या शोकातून सावरण्याऐवजी त्याने दुसऱ्या विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. या दुहेरी मृत्युमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. आई आणि मुलाच्या अशा अकाली जाण्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

संपूर्ण गाव ह्या दु:खद घटनेमुळे स्तब्ध झाले असून, जागृत महाराष्ट्र न्यूजच्या वतीने या घटनेला कव्हर करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *