मालाड, मुंबईतील एक प्रमुख विधानसभा मतदारसंघ, गेल्या १५ वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास साधला आहे. या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहेत – आमदार असलम शेख. साध्या कार्यकर्त्यापासून सुरुवात करून, त्यांनी आपल्या नेतृत्वाने मालाडचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकल्याच्या प्रतिक्रया जनतेतून येत आहेत.
व्यवसायवाढीसाठी सहकार्य
मालाडमधील लहान-मोठ्या व्यावसायिकांना आपल्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले. असलम शेख यांच्या प्रोत्साहनामुळे अनेक व्यावसायिकांना नव्याने व्यवसाय उभारण्याची संधी मिळाली. त्यांचा सततचा पाठिंबा मालाडच्या आर्थिक वाढीसाठी मोलाचा ठरला.
शिक्षणाच्या नव्या संधी:-
शिक्षण क्षेत्रातही असलम शेख यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी मालाडमध्ये अनेक शाळा उभारल्या, ज्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळाली. गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळाली.
आरोग्य सेवा:-
आधुनिक काळात आरोग्य हा एक गंभीर विषय ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर असलम शेख यांनी मालाडमध्ये मोफत रुग्णवाहिका सेवा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थापना केली. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी त्यांनी एक सक्षम आरोग्य यंत्रणा उभारली.
पर्यटन विकास:-
मालाडमधील अक्सा बीच हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे श्रेय असलम शेख यांना जाते. त्यांनी या समुद्रकिनाऱ्याला पर्यटन नकाशावर अग्रस्थानी आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.
विधानसभेत विरोधकांचा अभाव:-
गेल्या १५ वर्षांच्या कार्यकाळात असलम शेख यांनी मालाडचा विकास एका नव्या उंचीवर नेला. त्यांच्या कामगिरीमुळे आजपर्यंत कुठल्याही विरोधकांना टिकाव धरता आलेला नाही. आगामी निवडणुकीतही महायुतीने त्यांच्यासमोर उमेदवार दिलेला नाही, कारण त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
आत्मविश्वासाचा विजय:-
आगामी निवडणुकीत ३५,००० पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवण्याचा असलम शेख यांना आत्मविश्वास आहे. त्यांचा हा आत्मविश्वास त्यांच्या केलेल्या कामावर आणि जनतेने दिलेल्या विश्वासावर आधारित आहे.
निष्कर्ष
दमदार आमदार …..