मुंबई: काँग्रेस पक्षानं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून, त्यात ४८ जणांचा समावेश आहे. या यादीत मुंबईतील प्रमुख जागा मालाड, चांदिवली, धारावी, आणि मुंबादेवी यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसकडूनही उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. ठाकरेंनी ६५ जागा, तर राष्ट्रवादीकडून ४५ जागा घोषित केल्या आहेत.
काँग्रेसच्या पहिल्या यादीतील काही महत्त्वाचे उमेदवार:
- अक्कलकुवा: के.सी. पाडवी
- शहादा: राजकुमार गावित
- नंदूरबार: किरण तडवी
- मुंबादेवी: अमिन पटेल
- मालाड पश्चिम: अस्लम शेख
- चांदिवली: मोहम्मद आरिफ नसीम खान
- धारावी: ज्योती गायकवाड
- साकोली: नाना पटोले
- नागपूर उत्तर: नितीन राऊत
- संगमनेर: विजय उर्फ बाळासाहेब थोरात
- लातूर ग्रामीण: धीरज देशमुख
- लातूर शहर: अमित देशमुख
- कराड दक्षिण: पृथ्वीराज चव्हाण
- कोल्हापूर दक्षिण: ऋतुराज पाटील
- पालूस कडेगाव: विश्वजित कदम
ही यादी आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसच्या तयारीचं महत्त्वाचं पाऊल मानली जात आहे.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित 'केंद्रीय चुनाव समिति' की बैठक में महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए कांग्रेस उम्मीदवारों की लिस्ट। pic.twitter.com/tElqOKF6ak
— Congress (@INCIndia) October 24, 2024