परभणी – जिल्हास्तरीय स्पर्धेत जिंतूर तालुक्याचे वर्चस्व

प्रतिनिधी – रत्नदीप शेजावळे

परभणी – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी द्वारे आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा ६ ऑक्टोबर रोजी शिवाजी महाविद्यालय, परभणी येथे पार पडल्या. या स्पर्धेत जिंतूर तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांचे खेळाडू सहभागी झाले. त्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून तालुक्याचा दबदबा कायम ठेवला आहे. विजयी सर्व विद्यार्थ्यांना आणि प्रशिक्षकांना तालुक्यातून अभिनंदन मिळत आहे.

प्रमुख विजेते खेळाडू:

  • न्यू इरा इंग्लिश स्कूल, जिंतूर:
    • रक्षित चिद्रवार: 100 मी., 200 मी. धावणे, लांब उडी
    • गौरी घुगे: लांब उडी
    • मधुरा घुगे: गोळा फेक
    • प्रतीक जाधव: लांब उडी
    • आदित्य वानरे: बांबू उडी
    • निसर्ग घुगे: अडथळा शर्यत
  • सिद्धेश्वर विद्यालय, जिंतूर:
    • अश्विना जाधव: गोळा फेक
  • जयदुर्गा आश्रम शाळा, जिंतूर:
    • मुक्ता शिंदे व राधिका साबळे: भाला फेक
  • कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, जिंतूर:
    • स्वाती जाधव: थाळी फेक
    • मनीषा राठोड: 800 मी. धावणे व हातोडा फेक
  • ज्ञानोपासक महाविद्यालय, जिंतूर:
    • कोमल चव्हाण: 100 मी. व 200 मी. धावणे
    • पल्लवी खुळे: 400 मी. व 800 मी. धावणे
    • किरण मोहिते: हातोडा फेक
    • पायल राठोड: बांबू उडी
  • संत भगवान बाबा विद्या, इटोली:
    • विवेक चव्हाण: 100 मी. व 400 मी.
    • रितेश चव्हाण: 5000 मी.
  • साईबाबा विद्यालय, इटोली:
    • अनुराधा रानबावळे: अडथळा शर्यत
    • स्वप्नील खंदारे: 5000 मी. चालणे
  • शारदा विद्यालय, आडगाव:
    • ऋतुराज चव्हाण: 100 मी. व 200 मी.
  • श्रीमती बोर्डीकर विद्यालय:
    • कोमल काकडे: उंच उडी
  • जवाहर विद्यालय, जिंतूर:
    • दिशा जाधव, अंजली राठोड: बांबू उडी
    • स्वराज ठाकरे: हातोडा फेक
    • पूजा बुधवंत: तिहेरी उडी
  • जवाहर विद्यालय, वझर:
    • राजेश चोरमारे: 3000 मी.
    • कल्याणी पजई: उंच उडी
  • श्रीमती बोर्डीकर महाविद्यालय:
    • श्रद्धा धडके: 100 मी. अडथळा शर्यत व गोळा फेक

जिंतूर तालुक्याने 14 वर्ष, 17 वर्ष व 19 वर्ष गटांमध्ये एकतर्फी वर्चस्व निर्माण केले आहे. सर्व विजयी खेळाडूंचे शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

  • Related Posts

    जिंतूरमध्ये समता सैनिक दलाच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन; सामाजिक समतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल

    जिंतूर : शहरात दि. 3 नोव्हेंबर रोजी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा जिंतूरच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन सम्राट अशोक बुद्ध विहार येथे करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन तालुकाध्यक्ष मोहन भाऊ…

    जिंतूर तहसील कार्यालयाच्या नाकावर टिच्चून अतिक्रमण – भाग ५

    प्रतिनिधीरत्नदीप शेजावळे,जिंतूर जिंतूर तहसील कार्यालयात असलेले अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्यासाठी मागील चार भागात आपण संपूर्ण घटनाक्रम वाचला आहे. जिंतूर तहसील कार्यालयात असलेले अतिक्रमण हे शासकीय जागेचे अतिक्रमण आहे. ती कुणाची…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    WhatsApp Us