Breaking
1 Dec 2024, Sun

मुख्यमंत्री शिंदे: ‘लाडकी बहीण योजना’ गेमचेंजर, विरोधकांच्या धमक्यांना सडेतोड उत्तर

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय रंगभूमीवर सध्या एकाच नावाची चर्चा आहे – ‘लाडकी बहीण योजना’. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ही योजना एक मोठा गेमचेंजर ठरल्याचं सिद्ध केलं आहे. आता विरोधक म्हणताहेत, “आम्ही सत्तेत आलो, तर महायुतीने सुरू केलेल्या सर्व योजना बंद करू!” पण शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं, “लाडकी बहीण योजनेसह आम्ही घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयांना हात लावाल, तर तुमचाच कार्यक्रम होईल!”

सध्या महाराष्ट्रातील विरोधकांना ‘एकनाथ शिंदेचा आत्मविश्वास’ हे नवीन गुंतवणूक क्षेत्र वाटतंय. शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या संयुक्त पत्रपरिषदेत विरोधकांना स्पष्ट इशारा दिला गेला की, महायुतीच्या योजना बंद करण्याचा विचारसुद्धा करू नका. विशेषत: ‘लाडकी बहीण योजना’ आता तात्पुरती योजना नसून ती स्थायी झाली आहे. त्यासाठी ४५ हजार कोटींची वार्षिक तरतूदही करण्यात आली आहे. अजित पवारांनी या योजनेतील रक्कम भविष्यात वाढविण्याचाही विचार सुरू असल्याचं सूतोवाच केलं आहे.

विरोधकांच्या आरोपांना फडणवीसांचा प्रत्युत्तर

या पत्रपरिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टोलाही लगावला. “शरद पवारांना विचारतोय, तुमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण आहे? आम्ही इथे सीएम-सीएम करत नाही, आम्ही काम-काम करत आहोत,” असं ते म्हणाले. त्यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना विचारलं, “गुजरातची ब्रँड ॲम्बेसिडर महाविकास आघाडीच आहे का?”

फडणवीस यांचं हे विधान, जणू विरोधकांना ‘राजकीय गुगल मॅप’ वापरण्याचा सल्ला देतंय!

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहितीही या परिषदेत देण्यात आली. “मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिला होता आणि आम्ही तो पाळला. ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता हे साध्य केलं आहे,” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *