मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्रात 2024 विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपने मोठी घोषणा केली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते विनोद शेलार यांना पक्षाने मालाड पश्चिम मधून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे तीन वेळा आमदार आणि माजी मंत्री असलम शेख यांच्याविरुद्ध आता थेट भाजपचा आक्रमक सामना रंगणार आहे.
गेल्या 15 वर्षांपासून मालाड पश्चिम विधानसभेवर काँग्रेसचे एकछत्री राज्य राहिले आहे. असलम शेख यांनी आपल्या विकासकामांमुळे आणि सर्वसमावेशक नेतृत्वामुळे येथे आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. मात्र आता भाजपने विनोद शेलार यांच्यावर विश्वास टाकत काँग्रेसच्या या गडावर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
विनोद शेलार यांनी नागरिकांच्या रेशन कार्ड, आधार कार्ड कॅम्प, आणि सरकारी योजना राबवून प्रत्येक वॉर्डात आपली ओळख निर्माण केली आहे. याच कारणामुळे त्यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा जोर धरत होत्या. विनोद शेलार यांचे बंधु मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार बांद्रा मधून आमदार परिवार वाद पार्श्वभूमीवर तिकीट मिळण्याबाबत शंका व्यक्त केली जात होती, मात्र पक्षाने शेवटी विनोद शेलार यांना संधी दिली आहे.
भाजप मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तीवाना यांनी देखील या जागेसाठी स्पर्धा केली होती, परंतु भाजपने शेवटी अनुभवी शेलार यांच्यावर विश्वास ठेवला आहे. आता मालाड पश्चिमेत विनोद शेलार आणि असलम शेख यांच्यात तीव्र संघर्ष रंगणार आहे. काँग्रेसची सलग सत्ता असलम शेख राखून ठेवणार की भाजपचा नवीन चेहरा विनोद शेलार बाजी मारणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव मालाड, मुंबई