झारखंड विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण २१ उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत विविध समाज घटकांना प्राधान्य देण्यात आले आहे. पहिल्या यादीत अनुसूचित जमाती (एसटी) साठी ७ उमेदवार, अल्पसंख्याक समाजातून १ उमेदवार, इतर मागासवर्गीय समाजातून (ओबीसी) ८ उमेदवार आणि सामान्य वर्गातून ५ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
काँग्रेसच्या या पहिल्या यादीने राजकीय वर्तुळात चर्चा वाढवल्या आहेत. आता सर्वांच्या नजरा महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी काँग्रेसच्या यादीकडे लागल्या आहेत. महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार, याबद्दल आता कुतूहल निर्माण झाले आहे.