Breaking
1 Dec 2024, Sun

जिंतूर तहसील कार्यालयाच्या नाकावर टिच्चून अतिक्रमण – भाग १

प्रतिनिधी – रत्नदीप शेजावळे, जिंतूर

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील कार्यालय सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. सुरुवातीला  चव्हाळ बांबुंमध्ये असलेले अतिक्रमण आता लोखंडी पत्रा शेडमध्ये आल्याने या अतिक्रमणाचे रूपांतर लवकरच पक्क्या आरसीसी बांधकामात होतो की, काय? असा खोचक सवाल नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. या धैर्यशील अतिक्रमणावर कुणाचा वरद हस्त आहे. हे गुपीत मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

 

अधिक माहिती अशी की, जिंतूर तहसील कार्यालयात आजघडीला आत 22 आणि बाहेर 26अशी एकूण 46 दुकाने थाटली आहेत. याशिवाय चारचाकितून झेरॉक्स मशीन व्यवसाय करणारे चार वाहने उभी आहेत. अतिक्रमणाचे अर्धशतक होण्याला केवळ 2 दुकानाची कमतरता असल्याने दिवाळी नंतर आणखी नव्या दोन दुकानाची भर पडणार असून अतिक्रमणाचे अर्धशतक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

🔴 “तू बिनधास्त टपरी टाक, तहसीलदारांच टेंशन घेऊ नको, बाकी मी सांभाळतो”

अतिक्रमण करणारे बरेचजण कोणत्या न कोणत्या राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांचे छुपे हस्तक असल्याने राजकीय पुढाऱ्यांची बरीच बोगस कामे इथून सांभाळली जातात. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन मोहीम केवळ कागदावरच राहिली आहे. या अतिक्रमण धारकांत बहुसंख्य लोक राजकीय पाठबळाने बसलेले आहेत. “साहेबांचा एक फोन विषय खल्लास ” अशी परिस्थिती आहे.

🔴 नोटीस आली की उचला उचल बाकी जैसे थे

प्राप्त माहितीनुसार सर्व अतिक्रमण धारकांना त्यांची अवैध दुकाने उचलून घेण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती.नोटीस पालनाचा केवळ आदर म्हणून रातोरात दुकाने उचलून बाजूला ठेवली आणि आठच दिवसांत पुन्हा जैसे थे करण्यात आली. त्यामुळे तू मारल्या सारखं कर मी रडल्या सारखं करतो अशीच परिस्थिती आहे.

 

To be continue….

यांना विद्युत पुरवठा कसा होतो

बोगस कामे कशी चालतात याबद्दल आणखी काय घडामोडी आहेत हे पुढील भागात वाचा….

भाग २ वाचण्यासाठी येथे Click करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *