Breaking
5 Dec 2024, Thu

जिंतूर तहसील कार्यालयाच्या नाकावर टिच्चून अतिक्रमण – भाग २

जिंतूर तहसील कार्यालय परिसरातील अवैध दुकाने

तहसील कार्यालय परिसरातील अतिक्रमण धारकांनी झेरॉक्स आणि मुद्रांक शुल्क विक्रीसाठी दुकाने थाटली आहेत. ही दुकाने दिसायला छोटी आणि चव्हाळ बांबूची दिसत असली तरी यातून शासकीय कागदपत्रांची मोठ मोठी कांड घडवली जातात. या दुकानांवर घर, शेतजमीन, प्लॉट, यांसह ईतर कामे पूर्ण करून दिली जातात असे फलक लावण्यात आले आहेत. या दुकानातून प्रामुख्याने शेत जमिनी मोकळे प्लॉट निवासी घर ईत्यादी खरेदी विक्रीची कामे अधिक प्रमाणात करून दिली जातात. या दुकानांत संगणक आणि प्रिंटर मशीन जोडणी केलेली आहे. आधारकार्ड, राशनकार्ड,मतदानकार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, सातबारा होल्डिंग वरील बोजा कमी करून देणे अशी नं होणारी गुंतागुंतीची सर्व कामे आणि प्राधिकृत अधिकाऱ्याच्या परवानगीने ज्या जमिनी खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे नव्याने आणि दुरुस्ती करून प्राधिकृत अधिकाऱ्याच्या स्वाक्षरी शिक्क्यानिशी काढून दिली जातात. यासाठी नागरिकांकडून भरमसाठ पैसा उकळल्या जातो. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमांना पद्धतशीर नियमात बसवून दिले जाते. त्यामुळे अडले नडलेले गरजू लोक काम मार्गी लावण्यासाठी या ‘कागद फॅक्टरी’चा आसरा घेतात. संजय गांधी निराधार योजना आणि राजीव गांधी निराधार योजनेच्या फाईल देखील इथूनच तयार करण्यात येतात. त्यानंतर त्या दलाला मार्फत तयार करून दाखल करण्यात येतात. आणि त्याच फाईल मंजूर होतात हे विशेष.

🔴असे हेरतात ग्राहक…

दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्री करण्यासाठी आलेले खरेदीदार आणि विक्रीदार हे जेंव्हा निबंधक कार्यालयात निबंधकासमोर रजिस्ट्रीची बोलणी करतात तेंव्हा त्यांचा संवाद आजूबाजूला उभे राहून व्यवस्थीत आयकुन घेतला जातो. दोन्ही पार्ट्या कार्यालयाबाहेर आल्यावर “टेंशन घेऊ नका, तुमचं काम होऊन जाईल” या इकडे म्हणून पुढे प्रोसेस सुरू होते. गुंतागुंतीच्या आणि वादातीत व्यवहारात लागणारी कागदपत्रे त्यांचा रेट आणि लागणारा एकूण खर्च सांगून पुढे पद्धतशीर पैशांचा चुना लावायला सुरुवात होते. जी कागदपत्रे प्राधिकृत अधिकाऱ्याकडून मिळू शकली नाहीत ती सर्व कागदपत्रे याच “कागद फॅक्टरी” तून बनवून दिली जातात. त्यामुळे दुय्यम निबंधकांनी नाकारलेली रजिस्ट्री सर्व कागदपत्रे तयार करून  नियमांत बसवली जाते. यात दुय्यम निबंधक यांनी देखील कधीच लक्ष घातलेले नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे. बोगस कागदांच्या या “कागद फॅक्टरी”ला लगाम घालण्यासाठी मुळावर घाव म्हणजे ही अतिक्रमित दुकाने आहेत. त्यांना निष्कासित करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिंतूर तहसीलदार यांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करणे निकडीचे बनले आहे

 

भाग – १ वाचण्यासाठी येथे Click करा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *