मुंबई:आजकाल अनेक प्रवाशांना ऑनलाईन पेमेंटचा वापर करण्याची सवय लागली आहे, पण काहीवेळा त्यांना समस्या येतात, विशेषत: जेव्हा ऑटोचालकांकडे ऑनलाईन पेमेंटची सुविधा नसते.
अनेक प्रवासी रुबाबात ऑटोत बसतात आणि प्रवास पूर्ण झाल्यावर गूगल पे किंवा फोन पेसाठी विचारतात. मात्र, ऑटोचालकांच्या काही प्रतिक्रिया ठळक असतात: “गूगल पे आहे का?” यावर काही चालकांकडून येणारी तीच नाराजी, “पहिलं सांगायला पाहिजे होतं.” अशा तक्रारी रोजच वाढत आहेत.
प्रत्येकजण यावर आपली भूमिका स्पष्ट करतो. काहीजण म्हणतात की प्रवाशांनी ऑटोत बसण्यापूर्वीच ऑनलाईन पेमेंट चालणार का विचारायला पाहिजे. दुसऱ्यांकडून असं मत आहे की आता सर्वच जण ऑनलाईन पेमेंटचा वापर करत असल्याने ऑटोचालकांनी आपली सिस्टीम अपडेट करून ठेवायला हवी
2023 च्या आकडेवारीनुसार, गूगल पे कडे 15 कोटी आणि फोन पे कडे 20 कोटी ग्राहक आहेत. मात्र, भारताच्या 140 कोटी लोकसंख्येतून फक्त 35 कोटी नागरिक ऑनलाईन पेमेंटचा वापर करतात. यामुळे हे स्पष्ट होते की अजूनही बरेच लोक कॅश पेमेंटवर अवलंबून आहेत.
प्रवास करताना ऑनलाईन पेमेंटवरच अवलंबून राहणे काहीवेळा अडचणीचं ठरू शकतं. त्यामुळे नागरिकांनी प्रवासासाठी निघण्यापूर्वी कॅश ठेवणं महत्त्वाचं आहे. किंवा, प्रवास सुरू करण्यापूर्वीच ऑटो,टॅक्सी चालकांना विचारावं की ते ऑनलाईन पेमेंट स्वीकारतात का.
यामुळे दोन्ही बाजूंना अडचण होणार नाही, आणि संवादातूनच समस्या सोडवता येईल.
यात योग्य भूमिका कोणाची? तुमचे मत
जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव